कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळशाच्या किमतीत लक्षणीय घट; राष्ट्रीय कोळसा निर्देशांक 33.8% ने घसरला.


प्रभावी कोळशाचा साठा विविध क्षेत्रांना पुरेसा पुरवठा सुनिश्चित करतो.

Posted On: 26 JUL 2023 11:20AM by PIB Mumbai

राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांने (NCI) मे 2022 च्या तुलनेत हे 2023 मधे

33.8% ची लक्षणीय घट दर्शविली आहे. मे 2022 राष्ट्रीय कोळसा निर्देशांक 238.3 अंकांवर होता जो मे 2023 मध्ये 157.7 अंकांवर पोहोचला आहे. राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांतील ही घट देशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाची पुरेशी उपलब्धता आणि कोळशाचा बाजारात मजबूत पुरवठा यांचा निर्देशक आहे. 

त्याचप्रमाणे, नॉन-कोकिंग कोळशासाठी राष्ट्रीय कोळसा निर्देशांक, मे 2023 मध्ये 147.5 अंकांवर असून तो मे 2022 च्या तुलनेत 34.3% ची घसरण दर्शवतो. तर, कोकिंग कोल निर्देशांक मे 2023 मध्ये 32.6% घट नोंदवत 187.1 अंकांवर पोहोचला आहे. जून 2022 मध्ये राष्ट्रीय कोळसा निर्देशांकांने 238.8 अंकांवर पोहोचत नवी उंची गाठली होती. मात्र, त्यानंतरच्या काही महिन्यांत निर्देशांकात घट झाली, जी भारतीय बाजारपेठेत मुबलक कोळसा उपलब्धत असल्याचे दर्शवते.

राष्ट्रीय कोळसा निर्देशांक (NCI) हा एक किंमत निर्देशांक आहे जो अधिसूचित किमती, लिलाव किंमती आणि आयात किमतींसह सर्व विक्री मार्गातील कोळशाच्या किमती एकत्रित करतो. 2017-18 या आर्थिक वर्षाला आधारभूत वर्ष मानून स्थापित करण्यात आलेला राष्ट्रीय कोळसा निर्देशांक , कोळशाच्या किंमतीच्या चढउतारांबद्दल महत्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करतो तसेच बाजारातील गतिशीलतेचे एक विश्वासार्ह सूचक म्हणूनही काम करतो.

 

याव्यतिरिक्त, कोळशाच्या लिलावावरील प्रीमियम उद्योगाची नाडी दर्शवितो आणि कोळशाच्या लिलावाच्या प्रीमियममध्ये तीव्र घट बाजारात कोळशाच्या पुरेशा उपलब्धतेची पुष्टी करते. भारताच्या कोळसा उद्योगाने कोळसा कंपन्यांकडे प्रभावी साठा आहे हे सांगत भरीव साठ्याची पुष्टी केली आहे. ही उपलब्धता कोळशावर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांसाठी स्थिर पुरवठा सुनिश्चित करत राष्ट्राच्या एकूण ऊर्जा सुरक्षिततेमध्ये लक्षणीय योगदान देत आहे.

राष्ट्रीय कोळसा निर्देशांक (NCI) मधील घसरणीचा कल अधिक समतोल बाजार, पुरवठा आणि मागणी यांची सांगड दर्शवतो. पुरेशा कोळशाच्या उपलब्धतेमुळे राष्ट्र केवळ वाढत्या मागणीची पूर्तता करू शकत नाही तर त्याच्या दीर्घकालीन ऊर्जेच्या गरजा देखील पूर्ण करु शकते. यामुळे अधिक लवचिक आणि टिकाऊ कोळसा उद्योग विकसीत केला जाऊ शकतो.

***

JaideviPS/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1942760) Visitor Counter : 219