कोळसा मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत एकूण 223.36 दशलक्ष टन विक्रमी कोळसा उत्पादन
Posted On:
21 JUL 2023 1:35PM by PIB Mumbai
भारताच्या कोळसा क्षेत्राने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 8.5% ची भरीव वाढ नोंदवत एकूण 223.36 दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये याच कालावधीत 205.76 दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
कोल इंडिया लिमिटेड ने एप्रिल ते जून 2023 दरम्यान 175.48 दशलक्ष टन उत्पादन नोंदवले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील 159.75 दशलक्ष टनच्या तुलनेत 9.85% ची उल्लेखनीय वाढ दर्शवते. एप्रिल 2023 ते मे 2023 या कालावधीत कोळशाच्या आयातीत 16.76% ने वाढ झाली आहे, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, ही वाढ प्रामुख्याने कोळशाच्या आयात किंमतीतील लक्षणीय घसरणीला कारणीभूत आहे हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
कोळशाच्या उपलब्धतेबाबत, देशात पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. जून 23 अखेरीस हा साठा 107.15 दशलक्ष टन इतका आहे, यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 37.62% ची वाढ दिसून येते. कोळशाच्या साठ्याची भरीव उपलब्धता असल्यास कोळशावर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांना स्थिर पुरवठा करता येतो. ज्यामुळे देशाच्या एकूण ऊर्जा सुरक्षेला मोठा हातभार लावता येतो. कोळसा उत्पादनात भारताची ही उपलब्धी कोळसा उद्योगाच्या एकत्रित प्रयत्नांचे आणि देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीची कोळसा उद्योगाची वचनबद्धता दर्शवते.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941386)
Visitor Counter : 163