सहकार मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा नवी दिल्ली येथे 21 जुलै 2023 रोजी करणार प्राथमिक कृषी पतसंस्थां (पॅक्स) मार्फत सीएससी सेवांच्या वितरणावर राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
Posted On:
19 JUL 2023 6:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा 21 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करणार आहेत. 'प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (पॅक्स) माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सामाईक सेवा केंद्राच्या (सीएससी) सेवांचे वितरण हा या चर्चासत्राचा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवही यावेळी उपस्थित राहणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत सीएससीच्या सहकार्याने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) या चर्चासत्राचे आयोजन करत आहे. कार्यक्रमादरम्यान पॅक्सद्वारे सीएससी सेवांशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा केली जाईल. आत्तापर्यंत सीएससी पोर्टलवर 17,000 पॅक्सची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 6,000 पॅक्सने आधीच सीएससी सेवा देणे सुरू केले आहे.
कार्यक्रमादरम्यान ‘डिलिव्हरी ऑफ सीएससी सर्व्हिसेस बाय पॅक्स’ या विषयावरील लघुपटही दाखवण्यात येणार आहे.
कॉमन सर्व्हिसेस सेंटर्स हा मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत प्रमुख कार्यक्रमांपैकी एक आहे. आज देशभरात 5,20,000 सीएससी ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील ग्रामीण लोकांसाठी सरकारी आणि सार्वजनिक सेवांचे वितरण केंद्र म्हणून कार्यरत आहेत. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड हे एक स्पेशल पर्पज व्हेईकल (सीएससी एसपीव्ही ) आहे. सामायिक सेवा केंद्रांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी कंपनी कायदा, 1956 अंतर्गत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मेईटी) ही कंपनी 2009 मध्ये स्थापन केली.
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940801)
Visitor Counter : 166