कोळसा मंत्रालय
कोळसा आणि लिग्नाइट खाणींच्या स्टार मानाकंनासाठी नोंदणीला मुदतवाढ
Posted On:
19 JUL 2023 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
कोळसा मंत्रालयाने कोळसा आणि लिग्नाइट खाणींच्या स्टार मानाकंनासाठी नोंदणी आणि स्वयं-मूल्यांकनाची अंतिम तारीख 15 जुलै ते 25 जुलै 2023 पर्यंत वाढवली आहे. यात अधिकाधिक खाणींचा सहभाग वाढवण्यासाठी आणि अचूक स्वयं-मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी ही मुदतवाढ दिली गेली आहे.
30 मे 2023 रोजी, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या स्टार मानाकंनासाठी सर्व कोळसा आणि लिग्नाइट खाणींच्या नोंदणीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. यानंतर, स्टार रेटिंग पोर्टल 1 जून 2023 पासून नोंदणीसाठी उपलब्ध झाले आणि त्याला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. 14 जुलै 2023 पर्यंत पोर्टलवर 377 खाणींनी नोंदणी केली आहे. मात्र जास्तीत जास्त खाणींचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि अधिकाधिक खाणींना नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची स्वयं-मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी प्रदान करण्यासाठी, कोळसा मंत्रालयाने हा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940716)
Visitor Counter : 167