आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे केली सुलभ

Posted On: 19 JUL 2023 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जुलै 2023

 

जगभरातील सध्याची कोविड-19ची प्रचलित स्थिती आणि कोविड-19 लसीकरणामध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेवून परदेशातून भारतामध्‍ये येणा-या प्रवाशांसाठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिक सुलभ केली आहेत.

भारतीय प्रमाण वेळेनुसार दि. 20 जुलै 2023 च्या मध्‍यरात्रीपासून (रात्री 12.00वाजता) नवीन मार्गदर्शक तत्वे   लागू होणार आहेत.  या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भारतात येणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय  प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांना आर टी-पीसीआर  चाचणी करणे गरजेचे होते.  आता या चाचणीची  आवश्यकता  रद्द करण्यात आली आहे.

तथापि, कोविड-19 च्या संदर्भात एअरलाइन्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळण्याच्या सावधगिरीच्या उपायायोजना पूर्वीप्रमाणेच लागू असतील.

अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.mohfw.gov.in/) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने  कोविड-19 स्थितीकडे निरंतर बारीक लक्ष ठेवून आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940688) Visitor Counter : 94