उपराष्ट्रपती कार्यालय
चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाचे उपराष्ट्रपतींनी केले कौतुक
Posted On:
14 JUL 2023 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2023
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अभिनंदन केले.
एका ट्विटमध्ये, उपराष्ट्रपती म्हणाले:
"चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक प्रक्षेपणासाठी #ISRO च्या चमूचे अभिनंदन! हा विलक्षण पराक्रम देशाने अंतराळ विज्ञान आणि संशोधनात केलेली प्रगती अधोरेखित करतो. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा मैलाचा दगड प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे!"
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939542)
Visitor Counter : 203