सांस्कृतिक मंत्रालय

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत संस्कृती कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचा कर्नाटकातील हम्पी येथे समारोप


संस्कृती कार्यगटाच्या मागील दोन बैठकांमध्ये विचारविनिमय केलेल्या शिफारशींवर एकमत साधण्यासाठी तिसऱ्या बैठकीत भर

Posted On: 12 JUL 2023 4:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील संस्कृती  कार्यगटाच्या तिसऱ्या  बैठकीचा  आज कर्नाटकात  हंपी येथे समारोप झाला.भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील तिसऱ्या संस्कृती कार्यगटाच्या  बैठकीत चर्चा 11 जुलै 2023 रोजी पूर्ण झाली. 26 ऑगस्ट 2023 रोजी वाराणसी येथे आयोजित करण्यात आलेल्या आगामी जी 20 संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीच्या दिशेने, अद्यतने आणि प्रगतीसह संस्कृती कार्यगटाच्या  तिसऱ्या बैठकीतील अंतिम सत्राची सांगता झाली.

धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी संस्कृतीला स्थान देण्याचा  भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील संस्कृती कार्यगटाचा प्रयत्न आहे.खजुराहो आणि भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या मागील दोन संस्कृती कार्यगटाच्या  बैठकांमध्ये विचारविनिमय केलेल्या शिफारशींवर एकमत साधण्यासाठी संस्कृती कार्यगटाच्या तिसऱ्या  बैठकीत भर देण्यात आला.

कर्नाटकातील हम्पी येथील हजार राम मंदिरात आज जी 20 प्रतिनिधींनी योग सत्रात भाग घेतला. 

कला सांस्कृतिक ठेव्याच्या अनुभवाचा एक भाग म्हणून, हम्पी येथील ऐतिहासिक राणीची न्हाणी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. प्रतिनिधींना राजवाड्याची सफर देखील घडवण्यात आली. या सफरीनंतर  प्रतिनिधी विरुपाक्ष मंदिरासमोरील येदुरू बसवण्णा संकुलात गेले. या नयनरम्य ठिकाणी, कौसल्या रेड्डी यांनी नृत्य दिग्दर्शन  असलेला  गुरू राधा आणि राजा रेड्डी यांनी  एक चित्तवेधक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

तुंगभद्रा नदीवर कोरॅकल राइड  म्हणजेच टोपलीसारख्या होडीतून प्रतिनिधींना नदीची सफर घडवण्यात आली.

घटम या वाद्याला  आपल्या शास्त्रीय संगीत परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनवणाऱ्या  आणि जागतिक संगीतकारांसोबत फ्यूजन संगीत कार्यक्रमांद्वारे या कलेला जागतिक मंचावर नेणाऱ्या विक्कू विनायकराम या प्रसिद्ध संगीतकारांच्या  तालवाद्याच्या कलाकृतीचा आस्वाद  प्रतिनिधींनी घेतला.

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938958) Visitor Counter : 113