भारतीय निवडणूक आयोग

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (ए- डब्ल्यूबीई) च्या कार्यकारी मंडळाच्या 11 व्या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची उपस्थिती


जगभरातील निवडणूक अखंडतेला धोका पोहोचवणाऱ्या बनावट कथा हे एक आव्हान असून त्याचा मुकाबला करण्यासाठी ए- डब्ल्यूबीई सारखे मंच निवडणूक व्यवस्थापन संघटनांसाठी (ईएमबी) महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात: राजीव कुमार

Posted On: 12 JUL 2023 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ कोलंबियात कार्टाजेना येथे असोसिएशन ऑफ द वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (ए- डब्ल्यूईबी) च्या कार्यकारी मंडळाच्या 11 व्या बैठकीला उपस्थित आहेत. असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज ही जगभरातील निवडणूक व्यवस्थापन  संघटनांची (ईएमबी) शिखर संघटना आहे. 119 निवडणूक व्यवस्थापन संघटना आणि 20 प्रादेशिक संघटना/संस्था या शिखर संघटनेच्या सहयोगी सदस्य आहेत. कोलंबियाच्या नॅशनल सिव्हिल रजिस्ट्रीतर्फे 13 जुलै 2023 रोजी प्रादेशिक निवडणुका 2023 च्या आव्हानांवर जागतिक दृष्टिकोन या संकल्पनेवर एक आंतरराष्ट्रीय परिषदही आयोजित करण्यात आली आहे.

जगभरातील निवडणुकांच्या अखंडतेला धोका पोहोचवणाऱ्या कहाण्या हे एक आव्हान असून त्याचा सामना करण्यासाठी ए- डब्ल्यूबीसारख्या मंचांच्या माध्यमातून निवडणूक व्यवस्थापन संघटना एकत्रितपणे काम करू शकतात, या मुद्द्यावर कुमार यांनी चर्चेदरम्यान भर दिला.

कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सहभागींनी ए- डब्ल्यूइबीतर्फे 2023-24 मध्ये राबविल्या जाणार्‍या कार्यक्रम आणि उपक्रमांसह विविध विषयांवर चर्चा केली.

राजीव कुमार यांनी भारतीय निवडणूक आयोगातर्फे मांडलेले प्रस्ताव  - (i) ए- डब्ल्यूईबी पोर्टल स्थापन करणे. निवडणूक व्यवस्थापनाच्या विविध पैलूंविषयी निवडणूक व्यवस्थापन  संघटनेच्या सदस्यांनी सादर केलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि पुढाकारांचे भांडार म्हणून हे पोर्टल काम करेल.(ii) लोकशाही प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि महत्त्वाच्या पुढाकार घेणाऱ्या निवडणूक व्यवस्थापन  संघटनेच्या साठी ए- डब्ल्यूईबी जागतिक पुरस्कार सुरू करणे. दोन्ही प्रस्तावांना कार्यकारी मंडळाने मान्यता दिली.

भारतीय निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळात मनोज साहू, उप निवडणूक आयुक्त आणि सहसंचालक अनुज चांडक यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान साहू यांनी 2022-23 मधील इंडिया ए- डब्ल्यूईबी केंद्राच्या व्यवहारांचे संक्षिप्त सादरीकरण केले.

ए- डब्ल्यूईबीची स्थापना ऑक्टोबर 2013 मध्ये कोरिया प्रजासत्ताकातील सेऊल येथे झाली. सदस्य देशांमधील निवडणूक व्यवस्थापनाच्या प्रक्रियेच्या बळकटीकरणाद्वारे जगभरात शाश्वत लोकशाही साध्य करण्यासाठी सदस्यांमधील सामायिक दृष्टीकोनातून ही संघटना स्थापन झाली.

भारत ए- डब्ल्यूईबी केंद्र

सप्टेंबर 2019 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ए- डब्ल्यूईबी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी दस्तऐवजीकरण आणि संशोधनासाठी तसेच अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी नवी दिल्ली येथे भारत ए- डब्ल्यूईबी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ए- डब्ल्यूईबी केंद्र ' ए- डब्ल्यूईबी इंडिया जर्नल ऑफ इलेक्शन्स' या जागतिक दर्जाच्या जर्नलसह अनेक प्रकाशने आणि दस्तऐवज प्रकाशित करते.

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1938949) Visitor Counter : 138