नागरी उड्डाण मंत्रालय

डीजीसीए/ एईआरए/ एएआय मध्ये संस्थात्मक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण - 1222 नवीन पदांची निर्मिती

Posted On: 06 JUL 2023 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2023

भारताने नागरी विमान वाहतूक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून भारत आता जगभरातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनले आहे. यामुळे या उद्योगाच्या वाढत्या मागण्यांना प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी अधिक मानवी संसाधनांची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

ही अत्यावश्‍यक गरज लक्षात घेवून, नागरी उड्डाण मंत्रालयाने उल्लेखनीय उपक्रम हाती घेतले आहेत आणि मनुष्यबळाचा विस्तार करण्यासाठी अनेक संसाधने समर्पित केली आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA):

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, विमान वाहतूक सुरक्षा नियामक मंडळ म्हणून काम करत असून ते देशांतर्गत, देशाबाहेर आणि देशातकडे येणाऱ्या हवाई वाहतूक सेवांचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे. या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामध्ये एकूण 416 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यामुळे विमान वाहतूक निगराणी या क्षेत्रात सुरक्षित वातावरण प्रदान करण्यात मदत होईल.

विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (AERA):

विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण ही एक स्वतंत्र नियामक संस्था आहे जी भारतातील विमानतळांच्या आर्थिक नियमनावर देखरेख ठेवते. विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाद्वारे कार्ये जलद पार पाडण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सततच्या आग्रहाने एकूण 10 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)

भारतीय विमानतळ प्राधिकरण हे देशभरातील विमानतळांचे व्यवस्थापन, विकास आणि कार्यान्वयनासाठी जबाबदार असलेले वैधानिक प्राधिकरण आहे. संपूर्ण भारतातील विमानतळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासात भारतीय विमानतळ प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. एअर नेव्हिगेशन सेवांची एकमेव प्रदाता असणाऱ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवलेले हे एक सार्वभौम कार्य आहे. देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी पुरेशा हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी असण्याचे महत्त्व लक्षात घेऊन, जुलै 2021 पासून भारतीय विमानतळ प्राधिकरणात हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांच्या 796 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देशात सुरक्षित नेव्हिगेशन सेवा सुनिश्चित होईल.

 

 

S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1937842) Visitor Counter : 142