आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे बीजभाषण
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळामध्ये 9 उपक्रमांची केली सुरुवात
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय व केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. भागेल यांनी ‘एनईईटी’ पदव्युत्तर व ‘एमडीएस’ परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला
नारी शक्ती पारितोषिके, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची उत्कृष्टता पारितोषिके व कार्यकारी संचालक प्रशंसा पारितोषिक या श्रेणीतील आरोग्य सुविधा तज्ञांना पारितोषिके देऊन सन्मानित केले
ही वृद्धी वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अधिक मोठ्या संधी उपलब्ध करून देत आहे व सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर एकत्र आणण्यास भारत सक्षम असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झटत आहे; त्यातून अधिक आरोग्यदायी समाज आणि तंदुरुस्त देशाची उभारणी होत आहे: केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय
भारतात आजघडीला वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्राचे सुवर्णयुग सुरु आहे: केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह भागेल
देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरुन 704 झाली आहे आणि या वर्षी झालेली 52 वैद्यकीय महाविद्यालय
Posted On:
29 JUN 2023 9:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 29 जून 2023
राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाच्या (एनबीईएमएस) 42व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी याप्रसंगी बीजभाषण केले. नवी दिल्ली येथे काल झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह भागेल तसेच नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल देखील उपस्थित होते.
संस्थेने हाती घेतलेले विविध उपक्रम आणि सुरु केलेले अभ्यासक्रम यांच्या यशाबद्दल संस्थेचे तसेच प्रशासकीय सदस्यांचे मांडवीय यांनी अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री याप्रसंगी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या काळात 25 अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. ही वृद्धी वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अधिक मोठ्या संधी उपलब्ध करून देत आहे. सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि तज्ञ डॉक्टर एकत्र आणण्यास भारत सक्षम असून देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झटत आहे आणि त्यातून अधिक आरोग्यदायी समाज व तंदुरुस्त देशाची उभारणी होत आहे. देशाच्या विकासात आरोग्य क्षेत्राने फार मोठी भूमिका निभावली आहे, याचा पुनरुच्चार करून केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी भारताला येत्या काही वर्षांमध्ये विकसित देश म्हणून घडवण्यासाठी योगदान देण्याप्रती कटिबद्ध राहावे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यावेळी पुढील 9 उपक्रमांची सुरुवात केली:
1. एनबीईएमएस वैद्यक शास्त्रातील 11 नवे फेलोशिप कार्यक्रम
2. एनबीईएमएस आपत्कालीन आरोग्य सेवेतील पदविका
3. एनबीईएमएस परीक्षा प्रभुत्व केंद्र
4. एनबीईएमएस संगणकाधारित चाचणी केंद्र
5. एनबीईएमएस उत्तम वैद्यकीय सेवा विषयक मार्गदर्शक तत्वे (भाग दुसरा)
6. संयुक्त मान्यता कार्यक्रम आणि स्टँड-अलोन प्रकारच्या प्रयोगशाळा आणि निदान केंद्रे यांना मान्यता देण्यासंबंधी कार्यक्रम
7. एनबीईएमएस कौशल्ये आणि आभासी प्रशिक्षण कार्यक्रम
8. एनबीईएमएस मधील शिक्षकांसाठी विद्याशाखा शीर्षकाची सुरुवात
9. एनबीईएमएस वैद्यकीय ग्रंथसंग्रहालय
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. भागेल यांच्यासह खालील विभागांतील आरोग्य सुविधा तज्ञांनाही पारितोषिक देऊन गौरवले.
1. नारी शक्ती पारितोषिके
2. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची उत्कृष्टता पारितोषिके
3. कार्यकारी संचालक प्रशंसा पारितोषिक
4. एनबीईएमएस अध्यक्ष उत्कृष्टता पारितोषिक
डॉ. व्ही. के. पॉल यांच्या हस्ते एनबीईएमएस अध्यक्ष उत्कृष्टता पारितोषिक प्रदान करण्यात आले.
आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल विशेषतः ज्यांनी संकटांचा अगदी जवळून सामना केला आहे अशा निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करुन केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, भारताला उर्जेचा मोठा साठा म्हणून स्थापित करण्यात या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाने मोठी भूमिका निभावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या वसुधैव कुटुंबकम, एक पृथ्वी,एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनांची प्रशंसा करून ते म्हणाले, “या संकल्पना आम्हांला ’एक पृथ्वी, एक आरोग्य’ या ध्येयासह केवळ तंदुरुस्त भारतच नव्हे तर तंदुरुस्त जगाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देत आहेत.”
राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळ (एनबीईएमएस) ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असून आधुनिक वैद्यकशास्त्रातील अखिल भारतीय पातळीवरील परीक्षा घेण्याचे कार्य या संस्थेवर सोपवलेले आहे. ही संस्था गेल्या 4 दशकांपासून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेने गुणवत्तापूर्ण पदव्युत्तर तसेच पोस्टडॉक्टरल प्रशिक्षण देण्यासाठी देशातील विविध रुग्णालयांतील पायाभूत सुविधांचा वापर केला आहे. एनबीईएमएस ही संस्था गेली अनेक वर्षे अत्यंत यशस्वी पद्धतीने एनईईटी-पीजी, एनईईटी-एसएस तसेच एनईईटी-एमडीएस या परीक्षांचे यशस्वी आयोजन करत आहे. एनबीईएमएस या संस्थेने देशातील 1100 हून अधिक रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी विविध प्राविण्य अभ्यासक्रमांमध्ये 12,000 पेक्षा जास्त जागांना मान्यता देखील दिली आहे.
***
Shilpa P/Sanjana/CYadav
http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg
(Release ID: 1936212)
Visitor Counter : 153