पंतप्रधान कार्यालय
काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकला प्रदर्शित करणाऱ्या “वितस्ता-द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” या कार्यक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
28 JUN 2023 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरची समृद्ध संस्कृती, कला आणि हस्तकलेचे दर्शन घडविणाऱ्या “वितस्ता-द फेस्टिव्हल ऑफ काश्मीर” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे.
काश्मीरची समृद्ध कला, संस्कृती, साहित्य, कलाकुसर आणि पाककृती संपूर्ण देशापर्यंत पोहोचविण्यासाठी वितस्ता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चेन्नईपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांच्या मालिकेची श्रीनगरमध्ये सांगता झाली, ज्यामध्ये युवावर्गाने काश्मिरी संस्कृती जाणून घेण्याविषयी अतिशय उत्साह दाखवला. काश्मीरची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळा, कलाकुसरीवरील शिबिरे, परिसंवाद, हस्तकला प्रदर्शने यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लोकांनी भरभरून सहभाग नोंदवला आणि काश्मीरच्या संस्कृतीची ओळख करून घेतली.
व्हितस्ता कार्यक्रमाविषयी अमृत महोत्सवाच्या ट्विट श्रुंखलेला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी हे ट्विट केले आहे;
* * *
N.Chitale/S.Pargaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935890)
Visitor Counter : 163
Read this release in:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu