कोळसा मंत्रालय

कोळसा मंत्रालयाला व्यावसायिक कोळसा खाण लिलावाच्या 7व्या फेरीसाठी प्राप्त झाल्या 35 निविदा

Posted On: 27 JUN 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

कोळसा मंत्रालयाच्या नामनिर्देशित प्राधिकरणाने 103 कोळसा खाणींसाठी 29 मार्च 2023 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींसाठी लिलावाची सातवी फेरी सुरू केली.  बोली सादर करण्याची अंतिम तारीख 27 जून 2023 होती.

18 कोळसा खाणींसाठी एकूण 35 ऑफलाइन बोली प्राप्त झाल्या आहेत. यात सात खाणींसाठी दोन किंवा अधिक निविदा प्राप्त झाल्या आहेत.  लिलाव प्रक्रियेचा भाग म्हणून प्राप्त झालेल्या ऑनलाइन बोली निविदा 28 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे उघडल्या जातील.

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935694) Visitor Counter : 103