पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अल हकीम मशिदीला भेट

Posted On: 25 JUN 2023 4:04PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इजिप्त दौऱ्यादरम्यान, कैरो इथल्या अल हकीम मशिदीला भेट दिली. इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू विभागाचे मंत्री डॉ. मुस्तफा वझीरी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी बोहरा समाजाच्या नेत्यांचीही भेट घेतली. ह्या समुदायाचे लोक या फातीमिद  काळातील शिया मशिदीचे व्यवस्थापन आणि देखभाल करत आहेत. यावेळी, पंतप्रधानांनी भारत आणि इजिप्तमधील लोकांदरम्यान असलेले  दृढ संबंध अधोरेखित केले.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935185) Visitor Counter : 112