पंतप्रधान कार्यालय

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या द्वीपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक वक्तव्य

Posted On: 23 JUN 2023 6:46PM by PIB Mumbai

 

राष्ट्राध्यक्ष महोदय,

मी आपले मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि जिल बायडेन यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या प्रकारे अत्यंत आत्मीयतेने माझे आणि आमच्या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल तर मी आभार मानतो. त्याशिवाय आपण व्हाईट हाऊस ची दारे आज भारतीय समुदायासाठी खुली केली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या भारतीय समुदायाला भारत-अमेरिकेच्या भावी रणनीतीचे साक्षीदार बनण्याची संधी आपण दिलीत, याबद्दल मी आपले विशेष आभार मानतो.

 

सन्माननीय महोदय,

आपण कायमच भारताचे अतिशय उत्तम शुभचिंतक राहिले आहात आणि जेव्हा ही आपल्याला जिथे कुठे संधी मिळाली, तेव्हा आपण कायमच भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या महत्त्वाला खूप मोठी ताकद दिली आहे.खूप बळ दिले आहे. मला आठवते, की  आठ वर्षांपूर्वी, अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेला संबोधित करतांना, आपण एक फार महत्वाचा विचार मांडला होता- आमचे उद्दिष्ट, भारताचा सर्वोत्तम मित्र होण्याचे आहे आपले हे शब्द आजही माझ्या मनात घुमत आहेत. भारताप्रती आपली ही वैयक्तिक कटिबद्धता आपल्याला अनेक धाडसी आणि महत्वाकांक्षी पावले उचलण्यासाठी प्रेरणा देत आहे.

आज भारत-अमेरिका अंतराळ क्षेत्राच्या उंचीपासून ते सागराच्या खोलीपर्यंतप्राचीन संस्कृती पासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात, खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

राजनैतिक दृष्टीने जेव्हा कोणत्याही दोन देशांदरम्यानच्या संबंधांवर जी चर्चा केली जाते, त्यावेळी साधारणपणे औपचारिक संयुक्त निवेदने, कार्यकारी गट आणि सामंजस्य करार ह्याच चौकटीत चर्चा केली जाते. त्या सगळ्यांचे महत्त्व तर आहेच; पण भारत- अमेरिकेदरम्यानच्या संबंधांचे खरे इंजिन आमच्यातले लोकांमधील भक्कम संबंध हे आहे. आणि ह्या इंजिनाचा एक जोरदार ध्वनी, आपण व्हाईट हाऊसच्या लॉनवरही ऐकला.

 

सन्माननीय महोदय

आपण जे म्हणालात तेच पुन्हा सांगू इच्छितो, आज वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत देखील सर्वांची नजर जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाहींवर आहे, भारत आणि अमेरिकेवर आहे. मला असं वाटतं की आपली राजनैतिक भागीदारी मानव जातीच्या कल्याणासाठी, जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी, लोकशाही तत्वांवर विश्वास असलेल्या सगळ्या शक्तींसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची आहे.

मला खात्री आहे की पण मिळून संपूर्ण जगाचे सामर्थ्य वाढविण्यात नक्कीच यशस्वी होऊ.

आज आपल्या चर्चेत आपण अशा अनेक मुद्द्यांवर बोलू आणि आपल्या राजनैतिक संबंधांना नवे पैलू जोडले जातील. आपल्या ह्या हृदयापासूनच्या मैत्रीबद्दल मी  मनापासून आभार व्यक्त करतो.

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934903) Visitor Counter : 115