श्रम आणि रोजगार मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करून देशातील कार्यबळाला प्रतिष्ठित काम उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेसह देश अमृत काळाकडे वाटचाल करत आहे: केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन
Posted On:
14 JUN 2023 12:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 14 जून 2023
केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल, 13 जून 2023 रोजी जिनिव्हा येथे 111 व्या आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेला सामाजिक सुरक्षा प्रदान करून देशातील कार्यबळाला प्रतिष्ठित काम उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेसह देश अमृत काळाकडे वाटचाल करत आहे.
जी-20 समूहाच्या अध्यक्षतेच्या माध्यमातून भारताने जगातील देशा देशांमधील कौशल्यपूर्णतेत असलेली उणीव दूर करण्यासाठी साधनांचा शोध घेण्याचे तसेच कौशल्ये आणि पात्रता यांचे सुसंवादीकरण आणि परस्पर मान्यता देण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसह सर्व श्रमिकांना एकसमान आणि व्यापक सामाजिक सुरक्षेचे संरक्षण प्रदान करण्यासाठी शाश्वत अर्थपुरवठा यंत्रणा उभारण्याचे मार्ग शोधण्याच्या कार्यात जगासह एकत्रितपणे काम करण्याचे लक्ष्य देखील भारताने निश्चित केले आहे.
आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेच्या अनुषगाने, केंद्रीय मंत्री यादव यांनी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे महासंचालक गिल्बर्ट हाँगबो यांची देखील भेट घेतली. भारताच्या जो-20 अध्यक्षतेखाली, जागतिक कौशल्य तफावतीच्या ईडब्ल्यूजी प्राधान्यक्रम क्षेत्रांशी संबंधित समस्या, गिग आणि प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्था तसेच सामाजिक संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी शाश्वत वित्तपुरवठा यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जिनिव्हा येथील अरीयाना पार्कमध्ये असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापाशी जाऊन गांधीजींना नम्र आदरांजली वाहिली.
****
Sonal T/Sanjana C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932259)
Visitor Counter : 188