संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग याची येत्या 5 आणि 6 जून रोजी नवी दिल्लीत अमेरिका आणि जर्मनी च्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा
Posted On:
03 JUN 2023 10:02AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन आणि जर्मनीचे संरक्षण फेडरल मंत्री बोरीस पिस्टोरियस भारताच्या भेटीवर येत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकचे संरक्षण मंत्री ऑस्टीन यांना 5 जून रोजी भेटणार असून जर्मनीचे संरक्षण मंत्री पिस्टोरियस यांच्याशी ते 6 जून रोजी चर्चा करतील . संरक्षण विषयक द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता असून त्यात औद्योगिक सहकार्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
अमेरिकन संरक्षणमंत्री सिंगापूरहून दोन दिवसीय दौऱ्यावर भारतात 4 जूनला येत आहेत. ऑस्टीन यांची ही भारताच्या दौऱ्यावर येण्याची दुसरी वेळ असून यापूर्वी ते मार्च 2021 मध्ये भारतात आले होते.
जर्मन संघराज्याचे संरक्षण मंत्री भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांची ही भारतभेट 5 जूनपासून सुरू होत आहे. ते इंडोनेशियातून भारतात येत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्य़ाशिवाय, नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टता विषयक नवोन्मेष कार्यक्रमात अनेक संरक्षण संबंधी स्टार्ट अप्सच्या प्रमुखांनाही भेटण्याची शक्यता आहे. 7 जून रोजी ते मुंबईला भेट देणार असून पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयालाही तसेच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडलाही भेट देण्याची शक्यता आहे.
***
JPS/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929576)
Visitor Counter : 192