पंतप्रधान कार्यालय

ओदीशातील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 02 JUN 2023 10:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2023

ओदीशामध्ये  रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  तीव्र दुःख  व्यक्त केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ओदीशात झालेल्या  रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद  प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना.  जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी  मदत केली जात आहे.

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1929539) Visitor Counter : 202