संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल राजेश कुमार आनंद व्हीएसएम यांनी एअर ऑफिसर-इन-चार्ज प्रशासन (एओए) पदाचा स्वीकारला पदभार
Posted On:
01 JUN 2023 11:42AM by PIB Mumbai
विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल राजेश कुमार आनंद यांनी 01 जून 2023 रोजी एअर ऑफिसर-इन-चार्ज प्रशासन (एओए) म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेल्या एअर मार्शल यांची 13 जून 1987 रोजी भारतीय हवाई दलाच्या प्रशासकीय शाखेत हवाई वाहतूक नियंत्रक म्हणून नियुक्ती झाली होती. कॉलेज ऑफ एअर वॉरफेअरमधून त्यांनी हायर एअर कमांड अभ्यासक्रम आणि सिंगापूर हवाई अकादमीमधून एरिया कंट्रोल अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
एअर मार्शल यांनी आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत, विविध क्षेत्र आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सध्याच्या नियुक्तीपूर्वी ते हवाई मुख्यालय, नवी दिल्ली येथे महासंचालक (प्रशासन) पदावर कार्यरत होते.

***
S.Thakur/S.Chavan/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1928927)
Visitor Counter : 240