सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

जागतिक ‘मल्टीपल स्क्लेरोसिस’ दिनानिमित्त ‘एमएस’ विषयी जनजागरण मोहिमेचे आयोजन


‘एमएस’ आजारामुळे समाजात वावरताना आव्हाने निर्माण होतात, त्यामुळे हा आजार झालेल्‍या लोकांमध्‍ये एकटेपणाची आणि समाजापासून तुटल्याची भावना बळावते

Posted On: 31 MAY 2023 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) दिनामुळे,  संपूर्ण जगामध्‍ये या आजाराचा सामना करणा-या समुदायाला एकत्र आणण्‍याचे काम केले जात आहे.  मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) आजारामुळे प्रभावित असलेल्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी ही मोहीम  राबविण्‍यात आली आहे. जागतिक एमएस डे 2020-2023 ची संकल्पना  'कनेक्शन्स' अशी निश्चित केली आहे. ‘एमएस कनेक्‍शन’ ही मोहीम सामुदायिक कनेक्‍शन, स्‍वयं-कनेक्‍शन आणि दर्जेदार दक्षता साधने उपलब्‍ध व्‍हावीत, त्यासाठी सर्वांनी एकमेकांना जोडले जावे यासाठी आहे. या मोहिमेची टॅगलाइन ‘आय कनेक्ट, वी कनेक्ट’ अशी ठेवली आहे तर  मोहिमेचा हॅशटॅग एमएस कनेक्शंस आहे. एमएस कनेक्शनमुळे  सामाजिक अडथळ्यांचे आव्हान पेलण्यास मदत होत आहे.  ‘एमएस’ या आजारामुळे प्रभावित झालेल्या लोकांना एकटेपणा जाणवतो आणि आणि सामाजिकदृष्‍टीने आपण एकटे पडलो आहोत, असे त्यांना वाटत असते. या आजाराने बाधित असलेल्या मंडळींसाठी  चांगल्या सेवा उपलब्ध आहेत, त्‍यांच्याविषयी अधिक माहिती देण्‍याची, तसेच या रूग्‍णांना सहकार्य करणा-यांचे, एक नेटवर्क तयार करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर  स्वत: ची काळजी घेण्याची ही एक संधी आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारा दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग,  हा देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण  विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवणारा  ‘नोडल’ विभाग आहे. जनतेमध्ये मल्टीपल स्क्लेरोसिसबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, या  विभागाने 30 मे 2023 रोजी जागतिक मल्टीपल स्क्लेरोसिस दिवस साजरा केला.  या आजाराशी  संबंधित संस्थांमार्फत संपूर्ण भारतभर 40 हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले.  एमएस दिनाचा संकल्पना  रंग केशरी निश्चित केला  आहे. 30 मे, 2023 रोजी, एमएस आजारासंबंधी काम करणा-या इमारतींना केशरी रंगाने प्रकाशमान केले होते.

जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनानिमित्त- 30 मे, 2023 रोजी संपूर्ण जगभरामध्‍ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्‍ये :-

  1. जागरूकता निर्माण कार्यक्रम
  2. चर्चासत्र आणि कार्यशाळा
  3. प्रश्नमंजुषा स्पर्धा, भीत्तीचित्र बनवणे
  4. टीएलएम संचाचे वितरण
  5. ‘एमएसएसआय’ च्या संयुक्त विद्यमाने मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या व्यक्तींसाठी त्यांनी स्वत:हून पुढाकार घेवून आपल्या आजाराविषयी सांगणे म्हणजेच ‘सेल्फ अॅडव्होकसी’, त्यांच्यासाठी असलेल्या  सरकारी योजना आणि फायदे या विषयावर वेबिनार
  6. मल्टीपल स्क्लेरोसिसवर राष्ट्रीय वेबिनार - जागरूकता आणि संवेदना
  7. घरोघरी शारीरिक तपासणी शिबिर
  8. "मल्टिपल स्क्लेरोसिस आणि सर्वसमावेशक काळजीचे महत्त्व" या विषयावर वेबिनार.
  9. स्किझोफ्रेनियामधील प्रारंभिक हस्तक्षेपावर वेबिनार- एक मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ दृष्टीकोन.
  10. मदत आणि सहाय्यक उपकरणांचे वितरण.
  11. मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल जागरूकता निर्माण करणारी लघुनाटिका.

 

* * *

S.Thakur/S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928586) Visitor Counter : 133