पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फोर्टेस्क्यू मेटल्स ग्रुप आणि फोर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक डॉ. अँड्र्यू फॉरेस्ट यांच्याशी पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 23 MAY 2023 8:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 23 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियात  सिडनी येथे ऑस्ट्रेलियातील आघाडीचे उद्योगपती आणि फोर्टेस्क्यू मेटल्स ग्रुप आणि फोर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक  डॉ. अँड्र्यू फॉरेस्ट यांची  भेट घेतली.


हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याच्या फोर्टेस्क्यू समूहाच्या योजनेचे पंतप्रधानांनी स्वागत केले. नवीकरणीय उर्जेसंदर्भातील भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर अधिक भर देत पंतप्रधान मोदी यांनी भारताने हाती घेतलेल्या  हरित हायड्रोजन सारख्या परिवर्तनीय सुधारणा आणि उपक्रमांची विस्तृत  माहिती दिली.
फोर्टेस्क्यू फ्युचर उद्योग समूहाच्या भारतातील योजना आणि प्रकल्प यांच्याबाबत डॉ. फॉरेस्ट यांनी पंतप्रधानांना थोडक्यात माहिती दिली.

***

SushamaK/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1926538) आगंतुक पटल : 194
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam