पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल यांची घेतली भेट

Posted On: 22 MAY 2023 8:39AM by PIB Mumbai

हिंद  -प्रशांत  द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या  तिसऱ्या  शिखर परिषदेच्या निमित्ताने , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पापुआ न्यू गिनीचे  गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे यांची पोर्ट मोरेस्बी येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
प्रथमच पापुआ न्यू गिनीच्या  दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचे  गव्हर्नर-जनरल यांनी  स्वागत केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व आणि विकास भागीदारी  यावर  उभय  नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच हे सहकार्य  अधिक दृढ करण्यासाठी  त्यांनी सहमती दर्शवली.

***

SushamK/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1926221) Visitor Counter : 139