सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सहकारातून समृद्धी” या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नांतून, सहकार क्षेत्रात 1100 नवीन शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Posted On: 17 MAY 2023 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नांतून, सहकार क्षेत्रात 1100 नवीन शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) ला ‘‘ 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना निर्मिती आणि प्रोत्साहन’’ योजनेअंतर्गत या 1100 अतिरिक्त शेतकरी उत्पादक संघटना  स्थापन करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

शेतकरी उत्पादक संघटना निर्मिती योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी उत्पादक संघटनेला 33 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाते. समूह विकास म्हणजेच क्लस्टरच्या  धर्तीवर कार्यरत व्यवसाय संघटनेला  (सीबीबीओ) 25 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जाते.

ज्या प्राथमिक कृषी पतसंस्थांचे (PACS), सुमारे 13 कोटी शेतकरी सभासद आहेत आणि जे  प्रामुख्याने अल्प-मुदतीचे कर्ज आणि बियाणे, खते इ. वितरणात व्यस्त आहेत, ते आता इतर आर्थिक व्यवहार देखील करू शकतील. प्राथमिक कृषी पतसंस्थांचे, शेतकरी उत्पादक संघटनेत एकत्रीकरण झाल्यास नांगर, मशागत करण्यासाठी अवजारे, कापणी यंत्र यांसारख्या  कृषी उपकरणांच्या उत्पादन निविष्ठांच्या पुरवठ्याच्या क्षेत्रात आणि साफसफाई, परखणे, वर्गीकरण, प्रतवारी, पॅकिंग, साठवण, वाहतूक, इत्यादी प्रक्रियांच्या क्षेत्रात व्यवसाय वृद्धी करण्यासाठी ते सक्षम होतील. प्राथमिक कृषी पतसंस्था देखील मधमाशी पालन, मशरूम लागवड यासारखे उच्च उत्पन्न देणारे उपक्रम हाती घेण्यास सक्षम होईल.

या उपक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक बाजारपेठांशी संलंग्न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना रास्त भाव  मिळेल. त्याचप्रमाणे प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या आर्थिक घडामोडींमध्ये वैविध्य येईल, ज्यामुळे त्यांना उत्पन्नाचे नवीन आणि स्थिर स्रोत निर्माण करता येतील.

 

 

 

 

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924984) Visitor Counter : 163