पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते "मेरी लाईफ" मोबाईल अॅप्लिकेशनचा प्रारंभ


'मेरी लाईफ' या मोबाईल अॅपमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांकडून वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवरच्या उपाययोजनांना चालना देण्यासाठी सुरु केलेल्या लाईफ अभियान या लोकचळवळीअंतर्गत साधलेल्या प्रगतीचा रचनात्मक आढावा घेण्यास मदत होईल - भूपेंद्र यादव

Posted On: 15 MAY 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मे 2023

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज "मेरी लाईफ" (My life - माझे जीवन) या मोबाईल अॅप्लिकेशनचा प्रारंभ केला. येत्या 5 जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  युवा वर्गाला हवामान बदलासंदर्भातल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने कृती करण्याकरता प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 परिषदेत मांडलेल्या कल्पनेपासून प्रेरणा घेत हे अॅप तयार केले गेले आहे. या अॅपच्या माध्यमातून वस्तुंच्या बेफिकीर आणि निरर्थक वापराऐवजी, वस्तुंचा  योग्य जाणीवेने वापर करण्यावर भर दिला गेला आहे.

या अॅपच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या प्रक्रियेतील नागरिकांच्या, विशेषत: युवा वर्गाच्या ताकदीचे दर्शन घडेल असा विश्वास यादव यांनी यानिमीत्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत साध्या साध्या कृतींचा हवामानावर मोठा परिणाम होऊ शकतो ही बाबही या अॅपच्या माध्यमातून समोर येईल त्यांनी नमूद केले. यासंदर्भातले पोर्टल आणि हे मोबाईल अॅपच्या एकत्रित परिणामातून लाईफ या राष्ट्रीय चळवळीला गती मिळेल अशी आशाही यादव यांनी व्यक्त केली.

वापरकर्त्यांनी या अॅपवर यशस्वीरित्या  साइन-अप केल्यावर (अॅपवर स्वतःचे खाते तयार केल्यावर), त्यांना ऊर्जा बचत, पाणी बचत, एकदाच वापरता येण्याजोग्या प्लास्टिकचा वापर कमी करणे, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याशी संदर्भातल्या जबाबदारी स्विकारण्याविषयी विचारले जाईल. या अॅपचा वापर करत असताना वापरकर्त्यांना आपण एखादा खेळ खेळत असल्यासारखा अनुभव इथे येईल, आणि त्यांना मनोरंजक माध्यमातून 5 जूनसाठी 5 आव्हाने स्विकारण्यासाठी प्रेरीत केले जाईल. अँड्रॉईड मोबाईलधारकांसाठी गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध करून दिले आहे.

लाईफ या उपक्रमासाठी मंत्रालयाने दोन समर्पित पोर्टल अर्थात संकेतस्थळं निर्माण केली आहे. या संकेतस्थळांच्या माध्यमातून लाईफ उपक्रमाअंतर्गत साधलेल्या प्रगतीचा पूर्व निर्धारीत स्वरुपातील अहवाल तयार होईल आणि या प्रगतीचा आढावा घेणे शक्य होईल.

अवघ्या 10 दिवसांत, संपूर्ण भारतभरात लाईफ या चळवळीशी संबंधीत असलेले 1,00,000 पेक्षा अधिक उपक्रम हाती घेतले गेले आहेत, आणि याद्वारे या उपक्रमांशी जोडल्या गेलेल्या 1.7 दशलक्षपेक्षा जास्त नागरिकांना  पृथ्वी रक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले गेले आहे.

"मेरी लाईफ" (My life - माझे जीवन) या मोबाईल अॅप्लिकेशनच्या प्रारंभानिमीत्त झालेल्या कार्यक्रमाला,  पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन, वन महासंचालक आणि विशेष सचिव सी. पी. गोयल आणि युनिसेफ इंडियाच्या युवा विकास आणि भागिदारी अंतर्गतच्या जेन यू या उपक्रमाचे प्रमुख धुवराखा श्रीराम हे देखील उपस्थित होते.

 

A picture containing clothing, person, furniture, state schoolDescription automatically generated

Sensitization about Mission LiFE to students of the Karbi Tribes, Assam

A group of people picking up garbageDescription automatically generated with low confidence

Plastic collection campaign in Kondaveedu, Andhra Pradesh

 

A group of people standing in a fieldDescription automatically generated with medium confidence

Cleanliness drive organised in Nagrimalpora village, Jammu & Kashmir

 

 

A group of people on bicycles holding flagsDescription automatically generated with medium confidence

Mission LiFE Cycle Rally in Saharanpur, Uttar Pradesh

 

 

A group of people kneeling in front of a bannerDescription automatically generated with medium confidence

Awareness & Action Drive Under Mission LiFE at Leh Main Market, Ladakh

 

A group of people wearing blue helmets and face masks on a beachDescription automatically generated with low confidence

Beach Cleaning Campaign Organized in Kozhikode district, Kerala

 

 

A group of women standing in a windowDescription automatically generated with low confidence

LiFE Pledge Zone setup in Raipur, Chhattisgarh

 

 

A group of people holding postersDescription automatically generated with medium confidence

Mission LiFE awareness campaign organised in Gangtok, Sikkim

 

A group of children sitting at a tableDescription automatically generated with medium confidence

On-the-spot Painting Competition on LiFE in New Delhi

 

 

A person in uniform standing in front of a group of peopleDescription automatically generated with medium confidence

LiFE Workshop organised in Sikar, Rajasthan

 

Poster making competition in Ludhiana, Punjab

 

Visitors to the Regional Museum of Natural History, Bhubaneswar taking a LiFE pledge.

 

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1924189) Visitor Counter : 166