युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

अतनु दास आणि मेहुली घोष यांचा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ योजनेत पुर्नसमावेश


युवा नेमबाज तिलोत्तमा सेनचाही टॉप्स विकास गटात समावेश

Posted On: 11 MAY 2023 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

ऑलिम्पियन तिरंदाज आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा रौप्य पदक विजेता अतनु दासला यावर्षी देशांतर्गत स्पर्धेत आणि अंतल्या येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत केलेल्या कामगिरी नंतर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या  (MYAS) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेत (TOPS) पुन्हा सामील करण्यात आले आहे. पुरुषांच्या रिकर्व वैयक्तिक क्रमवारीत 673 गुण मिळवून चौथ्या स्थानावर असलेल्या अतनुने जवळपास दीड वर्षानंतर आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत पुनरागमन केले.

टॉप्समध्ये सामील होणाऱ्यांपैकी अन्य मोठी नावे म्हणजे रायफल नेमबाज मेहुली घोष जिने यावर्षी राष्ट्रीय नेमबाजी चाचण्यांमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धा जिंकली आणि 15 वर्षीय तिलोत्तमा सेन जिने यापूर्वी तिच्या वरिष्ठ गटातील पदार्पणात कैरो विश्वकप स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. याआधी तिने 2022 मध्ये कनिष्ठ विश्वकप अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक आणि सांघिक सुवर्णही पटकावले आहे.

टॉप्स कोअर आणि डेव्हलपमेंट याद्यांमध्ये एकूण 27 नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत ज्यामुळे आता टॉप्स खेळाडूंची एकूण संख्या 270 झाली आहे (कोअरमध्ये 101, डेव्हलपमेंटमध्ये 269).

संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923363) Visitor Counter : 152