रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काझीरंगा उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा घेतला आढावा
Posted On:
10 MAY 2023 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
काझीरंगा उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामातील प्रगतीचा आज आढावा घेण्यात आला अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पाठवलेल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे की या उपक्रमातून भारतीय वन्यजीव संस्थेने निश्चित केलेल्या आणि वन्य प्राण्यांच्या रहदारीच्या वाटेवर असणाऱ्या जागांवर सुमारे 34 किलोमीटर लांबीच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम होणार आहे. त्याव्यतिरिक्त, या प्रकल्पातून एकूण 50 किलोमीटर लांबीच्या मध्यम प्रकारच्या रस्त्याचा विस्तार करून चौपदरी महामार्गात रुपांतर आणि अंदाजे 3 किलोमीटर लांबीच्या बोगद्यांचे बांधकाम ही कामे देखील होणार आहेत.
प्रकल्पासाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बोगदे उभारणीच्या कामाला स्वतंत्र प्रकल्प समजावे आणि बोगदे तयार करताना निर्माण होणारा बांधकाम साहित्याच्या अवशेषांचा ढिगारा तसेच चिखल यांचा वापर रस्त्यांच्या बांधकामात केला जावा अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली. तसेच, पर्यटकांना वन्यजीव निरीक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उन्नत रस्त्यावरील मचाणे बांधताना त्यामध्ये वाहनांचे तात्पुरते थांबे तसेच किऑस्क उभारण्याच्या सूचना देखील दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1923241)
Visitor Counter : 141