आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 'सक्षम' शिक्षण व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रारंभ केला
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2023 10:21AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 'सक्षम' (शाश्वत आरोग्य व्यवस्थापनासाठी प्रगत ज्ञान) या शिक्षण व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रारंभ केला. हा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने विकसित केला आहे.


सक्षम हा देशातील सर्व आरोग्य व्यावसायिकांना ऑनलाइन प्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी समर्पित आणि एकत्रित मंच आहे. हा डिजीटल शिक्षण मंच ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील तसेच महानगरांमधील विशेष आरोग्य सेवा आणि कॉर्पोरेट रुग्णालयांधील आरोग्य व्यावसायिकांची सर्वसमावेशक क्षमता निर्मिती सुनिश्चित करेल.
सध्या 'सक्षम' शिक्षण व्यवस्थापन माहिती प्रणालीवर (SAKSHAM: LMIS ) ऑनलाइन पद्धतीने 200 हून अधिक सार्वजनिक आरोग्यविषयक तसेच 100 वैद्यकीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आरोग्य व्यावसायिक url: https://lmis.nihfw.ac.in/ या पोर्टलद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात आणि आवश्यक प्रशिक्षण आणि आवश्यक मूल्यांकन निकष पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळवू शकतात.
विशेष सचिव (आरोग्य) एस. गोपालकृष्णन, सहसचिव (आरोग्य) डॉ. मनश्वी कुमार, राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे संचालक डॉ. धीरज शाह, उपसंचालक निधी केसरवानी, राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे अधिष्ठाता डॉ. व्ही के तिवारी, डॉ. संजय गुप्ता, डॉ. पुष्पांजली स्वैन, डॉ. डी के यादव आणि आरोग्य मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
***
SonalT/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1923040)
आगंतुक पटल : 315