नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्बानंद सोनोवाल यांनी सितवे बंदरात पहिल्या भारतीय मालवाहू जहाजाचे केले स्वागत


यामुळे भारत आणि म्यानमार तसेच परिसरातील विस्तीर्ण प्रदेश यांच्यातील व्यापार संपर्क आणि लोकांमधील संबंधांना चालना मिळेल आणि सरकारच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणांतर्गत पूर्वोत्तर राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल : सर्बानंद सोनोवाल

Posted On: 09 MAY 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि म्यानमारचे उपपंतप्रधान तसेच केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री ॲडमिरल टिन आँग सॅन यांनी आज संयुक्तरीत्या म्यानमारच्या राखीन राज्यातील सितवे बंदराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान तिथे पहिले भारतीय मालवाहू जहाज दाखल झाले. या जहाजाला कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले होते.

सितवे बंदर कार्यान्वित झाल्याने द्विपक्षीय तसेच प्रादेशिक व्यापार वाढेल आणि यामुळे म्यानमारच्या राखीन राज्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. या बंदराद्वारे प्रदान करण्यात आलेल्या वाढीव संपर्क सुविधेमुळे या प्रदेशात रोजगाराच्या संधी आणि वर्धित विकासाची शक्यता निर्माण होईल.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी उद्घाटन समारंभात आपल्या भाषणात भारत आणि म्यानमार, विशेषत: म्यानमारचे राखीन राज्य यांच्यातील घनिष्ठ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा उल्लेख केला. सितवे बंदरासारख्या विकासात्मक उपक्रमांद्वारे म्यानमारच्या लोकांच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी भारताच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Sl.

         Stretch

Mode

Distance

(a)

Haldia to Sittwe port in Myanmar

Shipping

539 km

(b)

Sittwe to Paletwa    (River Kaladan)

 IWT

158 km

(c)

Paletwa to Indo-Myanmar Border (in Myanmar)

Road

110 km

(d)

Indo-Myanmar Border to NH.54  (in India) 

Road

100 km

सितवे बंदर हे कलादान बहु- आयामी ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आले आहे. यासाठी भारत सरकारने अनुदान रुपात सहाय्य निधी पुरवला आहे. केएमटीटीपीचे जलमार्ग आणि रस्ते पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर भारताची पूर्व किनारपट्टी सितवे बंदराद्वारे ईशान्येकडील राज्यांशी जोडली जाईल.

 

 

 

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922805) Visitor Counter : 192