रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2023 मध्ये, भारतीय रेल्वेने 126.46 मेट्रिक टन इतक्या विक्रमी मासिक मालवाहतुकीची केली नोंद


एप्रिल महिन्यातील वाढीव माल लोडिंग 4.25 मेट्रिक टन इतके, एप्रिल 2022 च्या तुलनेत त्यात 3.5 टक्क्यांची वाढ

एप्रिल महिन्यात रेल्वे मालवाहतुकीतून 13,893 कोटी रुपये महसूल जमा, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील 13,011 कोटी रुपयांच्या मालवाहतूक महसूलाच्या तुलनेत यंदा 7 टक्क्यांची वाढ

Posted On: 08 MAY 2023 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2023

भारतीय रेल्वेने एप्रिल 2023 मध्ये 126.46 मेट्रिक टन इतक्या मासिक मालवाहतुकीची नोंद केली आहे. एप्रिल महिन्यात वाढीव माल लोडिंग 4.25 मेट्रिक टन आहे.  2022 एप्रिल मधील मालवाहतुकीच्या तुलनेत त्यात 3.5% ची वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये मालवाहतूकीतून मिळणारा  महसूल 13,893 कोटी रुपये इतका आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात संकलित 13,011 कोटी रुपयांच्या तुलनेत, या मालवाहतुकीत 7% ची वाढ झाली आहे.

भारतीय रेल्वेने एप्रिल 2023 मध्ये 62.39  मेट्रिक टन कोळशाची वाहतूक केली. तर, एप्रिल 2022 मध्ये ही वाहतूक 58.35 मेट्रिक टन इतकी होती. त्याखालोखाल, 14.49 मेट्रिक टन लोह खनिज,  12.60 मेट्रिक टन सिमेंट, 9.03 मेट्रिक टन शिल्लक इतर वस्तू, 6.74 मेट्रिक टन कंटेनर्स , 5.64 मेट्रिक टन पोलाद, 5.11 मेट्रिक टन अन्नधान्य, 4.05 मेट्रिक टन खनिज तेल आणि 3.90 मेट्रिक टन खतांची वाहतूक केली आहे.

मालवाहतुक वाढवण्याचे उद्दिष्ट घेऊन, भारतीय रेल्वेने त्यासाठी सातत्यपूर्ण आणि सक्रिय प्रयत्न केले आहे. त्यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे, परवडणाऱ्या दरात डिलिव्हरी सेवा देणे, अशा सगळ्या गोष्टींमुळे पारंपरिक मालवाहतुकीसोबतच, नव्या गोष्टींच्या मालवाहतुकीसाठी रेल्वेला पसंती देण्याचे प्रमाण वाढले आहे.

S.Kakade/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 


(Release ID: 1922523) Visitor Counter : 161