संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

सुदान मधून IAF C-17 च्या माध्यमातून सुमारे 24 तासांची सलग बचाव मोहीम

Posted On: 06 MAY 2023 12:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2023

03 - 04 मे 2023 च्या मध्यरात्री भारतीय वायूदलाच्या C-17 या ग्लोब मास्टर विमानानं हिंडानहून उड्डाण करत रात्रभर प्रवास करुन पहाटे सौदी अरेबियाच्या जेद्दाह इथं पोहोचलं. या विमानाने जेद्दाह इथं पुन्हा एकदा इंधन भरलं आणि त्यानं तिथून युद्धजन्य परिस्थिती असलेल्या सुदान मार्गे भारताकडे परतीचा सलग प्रवास सुरू केला.  या विमानाने इंधनाच्या अनुपलब्धतेची परिस्थिती तसच सुदान मध्ये इंधन भरण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी जेद्दाह इथून अतिरिक्त इंधनाचा साठा करून घेतला. ही एक अशी विशेष मोहीम होती ज्यात 192 प्रवासी सहभागी होते ज्यामध्ये बहुतांश महिला, मुलं आणि वयस्कर व्यक्तींचा समावेश होता. यातले बरेच जण अनिवासी भारतीय, परदेशी नागरिक अथवा परदेशात राहणारे भारतीय नागरीक होते. या सर्वांना जेद्दाह इथे घेऊन जाणे शक्य नव्हते आणि परिणामी त्यांना भव्य जेटच्या माध्यमातून सलग विमानाने थेट भारतात आणणे आवश्यक होते.

सुदान मध्ये कोणत्याही परिस्थितीत उड्डाण भरत येईल अशा स्थितीत सदर विमान ठेवले.

अशातच एक प्रवासी विमानातच बेशुद्ध झाल्याने विमान कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवलेल्या या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र त्या प्रवाशाला स्थिर करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करत कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती त्वरेने आणि अत्यंत कुशलतेनं हाताळली.

या विमानाचं 4 मे 2023 रोजी रात्री उशिरा अहमदाबाद इथं आगमन झालं आणि त्याच दिवशी ते विमान रात्री हिंडन तळावर परतलं. अशा प्रकारे विमानातल्या कर्मचाऱ्यांनी सुमारे 24 तास सलग अतिरिक्त कालावधीतही कार्यरत राहत आपल्या काही उर्वरित अडकलेल्या नागरिकांना मायदेशी परत आणलं.

S.Thakur/S.Naik/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1922272) Visitor Counter : 111