गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंजाबमधील  मुख्तसर साहिब येथे उपस्थित राहून पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत प्रकाश सिंग बादल यांच्या ‘अंतिम अरदास’ विधीमध्ये भाग घेतला आणि बादल यांना श्रद्धांजली वाहिली

Posted On: 04 MAY 2023 3:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंजाबमधील मुख्तसर साहिब येथे उपस्थित राहून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कै.प्रकाश सिंग बादल यांच्या अंतिम अरदासविधीमध्ये भाग घेतला आणि बादल यांना श्रद्धांजली वाहिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001U30J.jpg

प्रकाश सिंग बादल यांच्या निधनामुळे केवळ पंजाबातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की बादल यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. प्रकाश सिंग बादल यांच्या मृत्यूमुळे शीख समाजाने खरा सेनानी गमावला, देशाने एक देशभक्त गमावला तर शेतकरी समुदायाने त्यांचा सच्चा सहानुभूतीदार  गमावला तर देशाच्या राजकारणाने अत्यंत उच्च आदर्श घालून देणारा महान माणूस गमावला.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की प्रकाश सिंग बादल यांनी 70 वर्षांचे प्रदीर्घ सामाजिक जीवन व्यतीत केले, बादल साहेब यांच्याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती, विरोधक निर्माण न करता इतके जीवन जगू शकणार नाही.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003HB3V.jpg

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, 1970 पासून आतापर्यंत, ज्या ज्या वेळी जेव्हा देशासाठी एखादी भूमिका घेण्याची वेळ आली त्या वेळी बादल साहेबांनी कधीही माघार घेतली नाही. बादल साहेबांनी त्यांच्या तत्वांसाठी तसेच संप्रदायासाठी लढा दिला आणि त्यांच्या सामाजिक जीवनातील फार मोठा काळ तुरुंगात व्यतीत झाला. आणीबाणीच्या काळात, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी प्रकाश सिंग बादल ठामपणे उभे राहिले असे ते म्हणाले. कारगिल युध्द असो किंवा दहशतवादाविरोधातील लढा, राष्टहितासाठी बादल साहेब   प्रत्येक आघाडीवर एखाद्या ढालीसारखे उभे राहिले.

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921981) Visitor Counter : 110