युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
उत्तर प्रदेशात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 चे बोधचिन्ह, शुभंकर, जर्सी आणि स्पर्धागीताचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या करणार उद्घाटन
Posted On:
04 MAY 2023 3:27PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या उत्तर प्रदेशात लखनौमधील गोमती नगर येथे इंदिरा गांधी प्रतिष्ठान संकुलात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 चे बोधचिन्ह, शुभंकर, जर्सी आणि स्पर्धागीताचे उद्घाटन करणार आहेत.
23 मे ते 3 जून दरम्यान तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा(केआययूजी) आयोजित होणार असून लखनौच्या बाबू बनारसी दास विद्यापीठात या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात येईल.
युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, उत्तर प्रदेशचे क्रीडामंत्री गिरीश चंद्र यादव देखील इतर मान्यवरांसोबत उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
केआययूजीच्या आगामी स्पर्धेत देशभरातील 200 पेक्षा जास्त विद्यापीठांमधील सुमारे 4700 खेळाडू सहभागी होतील आणि एकूण सहभाग 7000च्या वर पोहोचेल. या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळांच्या 21 प्रकारांचा समावेश असेल जो विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातील एक उच्चांक आहे. यामध्ये पहिल्यांदाच रोईंग या प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धा राज्याची राजधानी लखनौ व्यतिरिक्त वाराणसी, नॉयडा आणि गोरखपूर येथे होणार आहेत. डीडी स्पोर्ट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरून या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921966)
Visitor Counter : 178