गृह मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचा केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमात घेतला श्रवणानंद

Posted On: 30 APR 2023 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2023   

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’कार्यक्रमाचे आज 100 भाग पूर्ण झाले. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये ‘मन की बात’कार्यक्रमाच्या 100 व्या भागात पंतप्रधानांचे विचार ऐकले.

यासंदर्भात ट्वीट करून अमित शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’कार्यक्रमाचे आज 100 भाग पूर्ण झाले, ज्यामधून एका प्रभावी नेतृत्वाच्या आदर्श पदचिन्हांचा ठसा उमटला आहे. मी मन की बातचा 100 वा भाग मुंबईत ऐकला. पंतप्रधानांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनातून तरुण पिढीला देशाचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी स्वीकारण्याची आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा मिळाली आहे.

‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे संदेश देतात ते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरून आपला प्रभाव निर्माण करतात, सरकार आणि लोकांमध्ये सेतू निर्माण करतात, असे ते म्हणाले. विविध प्रदेश, भाषा आणि बोली यावरील संवादांना व्यासपीठ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सामाजिक लोकशाही बळकट केली आहे, असे शाह यांनी सांगितले. 

 

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920941) Visitor Counter : 108