ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रब्बी विपणन हंगाम 2022-23 मध्ये केलेल्या खरेदीला मागे टाकत चालू हंगामादरम्यान आतापर्यंत 195 एलएमटी गहू खरेदी


धान खरेदीही सुरळीत सुरू

Posted On: 27 APR 2023 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2023

 

रब्बी विपणन हंगाम 2022-23 च्या तुलनेत  2023-24 च्या रब्बी विपणन हंगामा दरम्यान यापूर्वीच अधिक  गहू खरेदी नोंदवली आहे.

रब्बी विपणन हंगाम 2022-23 मध्ये गहू खरेदी 188 एलएमटी (लाख मेट्रिक टन )  होती. तर चालू हंगामात 26 एप्रिल 2023 पर्यंत ही गहू  खरेदी 195 एलएमटी झाली आहे.याचा मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना  झाला आहे. सध्या सुरू असलेल्या गहू खरेदी प्रक्रियेदरम्यान सुमारे 14.96 लाख शेतकऱ्यांना हमीभावानुसार   सुमारे रु. 41148 कोटी  यापूर्वीच अदा करण्यात  आले आहेत.

विशेष म्हणजे, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या तीन गहू उत्पादक  राज्यांकडून अनुक्रमे 89.79 एलएमटी  54.26 एलएमटी  आणि 49.47 एलएमटी गहू खरेदी करण्यात आली असून यात या तीन राज्यांचा मोठा वाटा आहे.

अवकाळी पावसाचा परिणाम गव्हावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गहू  खरेदीच्या गुणवत्तेच्या विनिर्देशांमध्ये  भारत सरकारने  दिलेली सूट हा या वर्षी प्रगतीपथावर असलेल्या खरेदीला हातभार लावणारा एक प्रमुख घटक  ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल आणि कोणत्याही आपदजन्य  विक्रीला आळा बसेल.

जास्तीत जास्त गहू उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी  आधीच अस्तित्वात असलेल्या नियुक्त खरेदी केंद्रांव्यतिरिक्त. केंद्र सरकारने सर्व राज्यांना गाव/पंचायत स्तरावर खरेदी केंद्रे उघडण्यासाठी  तसेच सहकारी संस्था/ग्रामपंचायत/ इत्यादींमार्फत खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

शिवाय, धान  खरेदीही सुरळीत सुरू आहे. खरीप विपणन हंगाम  2022-23 मध्ये  26.04.2023 पर्यंत 354 एलएमटी  धान खरेदी करण्यात आली असून अजून 140 एलएमटी  धान  खरेदी   बाकी आहे.. खरीप विपणन हंगाम 2022-23  दरम्यान   रब्बी पिक 106 एलएमटी  धान  खरेदीचा  अंदाज आहे.

मध्यवर्ती भांडारामध्ये  गहू आणि धान यांचा एकत्रित साठा 510 एलएमटीच्या पुढे गेला आहे. यामुळे   देशाला अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देश सुस्थितीत पोहोचला आहे. गहू आणि धान खरेदी सुरू असल्याने, सरकारी धान्य कोठारांमध्ये अन्नधान्याचा साठा वाढत आहे.

 

* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920279) Visitor Counter : 230