श्रम आणि रोजगार मंत्रालय
फेब्रुवारी 2023 मध्ये ईएसआय योजने अंतर्गत 16.03 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भर
फेब्रुवारी 2023 मध्ये ईएसआय योजने अंतर्गत सुमारे 11,000 नव्या आस्थापनांची नोंदणी
Posted On:
18 APR 2023 2:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023
कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ESIC)ने प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या रोजगारसूची आकडेवारीनुसार कर्मचारी राज्य विमा योजनेमध्ये (ईएसआय योजना) फेब्रुवारी 2023 मध्ये 16.03 लाख नव्या कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे. या आकडेवारीनुसार कर्मचारी राज्य विमा योजने अंतर्गत 11,000 नव्या आस्थापनांची नोंदणी झाली असून त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित झाली आहे.
नव्या नोंदणीमध्ये 25 वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त असून या महिन्यात नोंदणी झालेल्या एकूण कर्मचारीसंख्येत त्यांची संख्या 7.42 लाख म्हणजे 46 टक्के आहे. देशातील युवा वर्गाला रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत असल्याचे यातून दिसून येत आहे.
2023 मधील या रोजगारसूचीचे लिंगनिहाय वर्गीकरण केल्यावर त्यामध्ये 3.12 लाख महिला कर्मचाऱ्यांची भर पडली असल्याचे सूचित होत आहे. त्याच प्रकारे फेब्रुवारी महिन्यात ईएसआय योजनेत 49 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे. यातून असे दिसत आहे की ईएसआयसी समाजातील प्रत्येक घटकाला तिचे लाभ मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. रोजगारसूचीची ही आकडेवारी तात्पुरती असून, या आकडेवारीमध्ये भर पडून नवी आकडेवारी निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1917609)
Visitor Counter : 158