पंतप्रधान कार्यालय
नागालँडमधील वनसोई गावातील लोकांचे पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
15 APR 2023 10:16AM by PIB Mumbai
महिलांप्रती प्रगतीशील धोरण स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील वनसोई गावातील लोकांचे कौतुक केले आहे.
एका ट्विटमध्ये राज्यसभा खासदार एस. फांगनॉन कोन्याक यांनी माहिती दिली की, वनसोईच्या महिलांना प्रथमच मोरुंगमध्ये प्रवेश करण्याची आणि लॉगड्रम वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या परंपरेत स्त्रियांना मोरंग मध्ये प्रवेश दिला जात नव्हता.
खासदारांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“ हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे, जे महिलांच्या सन्मानाला आणि सक्षमीकरणाला चालना देईल. वनसोई गावातील लोकांचे अभिनंदन.
***
S.Thakur/V.Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1916838)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam