वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांनी घेतली फ्रान्सचे परदेशी व्यापार, आर्थिक गुंतवणूक आणि परदेशातील फ्रेंच नागरिकांसंबंधीच्या बाबींचे मंत्री ऑलिव्हियर बेख्त यांची भेट
Posted On:
12 APR 2023 8:45AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, पीयूष गोयल यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यात काल परदेशी व्यापार, आर्थिक गुंतवणूक आणि परदेशातील फ्रेंच नागरिकांसंबंधीच्या बाबींचे मंत्री ऑलिव्हियर बेख्त यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी आपापल्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर चर्चा केली. युरो क्षेत्रात चलनफुगवट्याचा सर्वात कमी दर फ्रान्सचा असून तो 5.2% आहे. हा दर इतर युरोपीय संघ देशांच्या सरासरीच्या निम्मा आहे. वर्ष 2022 मध्ये बेरोजगारी 7% आणि जीडीपी वाढ 2.6% झाली; या वर्षासाठी अपेक्षित वाढ 0.6-1% आहे, असे बेख्त यांनी सांगितले.
भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे गोयल यांनी नमूद केले. भारतात आधी चलनफुगवट्याचा दर दोन अंकी असे तो आता 6 - 6.5% असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षीची वाढ जीडीपीच्या 6.8% आहे आणि नाममात्र दराने 13% वाढ झाली आहे,असे त्यांनी सांगितले.दोन्ही देशांच्या व्यापारात वृद्धी असून आणखी वृद्धीसाठी आणखी अनेक पावले उचलता येऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. राफेल खरेदी आणि अलीकडील एअरबसमुळे या भागीदारीमध्ये यात मोलाची भर पडली आहे. बेख्त यांनी नमूद केले की 2021-22 मध्ये द्विपक्षीय व्यापार 15.1 अब्ज अमेरिकी डॉलर्स होता, जो गेल्या दशकात दुप्पट झाला. भारतातील एक आघाडीचा विदेशी गुंतवणूकदार असलेल्या फ्रान्समधून परदेशी थेट गुंतवणूक 10 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. फ्रान्समधल्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय कंपन्या फ्रान्समध्ये गुंतवणूक वाढवत आहेत आणि सध्या सुमारे 300 मिलियन युरोची गुंतवणूक आहे, असे त्यांनी सांगितले. भाषाविषयक अडथळे तोडून व्यापार आणखी वाढवता येऊ शकतो, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले.
दोन्ही नेत्यांनी भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करार वाटाघाटींशी संबंधित प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा केली. विशेषतः बाजार प्रवेशाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भारत पुढील 10 वर्षांत 2000 व्यावसायिक विमाने खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे सांगून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात व्यावसायिक विमाने निर्माण करण्याची मोठी संधी असल्याचे गोयल यांनी नमूद केले.
दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी जागतिक व्यापार संघटनेतील परस्पर देशांच्या हिताच्या विषयांवरही चर्चा केली.
बेख्त यांनी फ्रेंच कंपन्यांच्या भारतातील थेट गुंतवणुकीवर विस्ताराने चर्चा केली आणि पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा आणि गतिशीलता यामध्ये परस्पर संधी असल्याचे सांगितले. फ्रान्सने कोची, नागपूर आणि अहमदाबाद येथील सार्वजनिक प्रकल्पांना पाठबळ दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गोयल यांनी ऑगस्ट 2023 मध्ये जी 20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीनिमित्त बेख्त यांना फ्रेंच समुदायासह भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
****
Jaydevi/Sonali/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1915833)
Visitor Counter : 158