पंतप्रधान कार्यालय
बांदीपूर आणि मदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना पंतप्रधानांनी दिली भेट
Posted On:
09 APR 2023 2:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये बांदीपूर आणि मदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली. मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात त्यांनी थेप्पाकडू हत्ती कॅम्पला सुद्धा भेट दिली आणि माहूत आणि कवाडी यांच्याशी संवाद साधताना हत्तींना खाऊही घातलं. ऑस्कर विजेता डॉक्युमेंटरी ‘एलिफंट व्हिस्परर्स’मध्ये चित्रीत केलेल्या गजपालकांशीही पंतप्रधानांनी संवाद साधला.
एका ट्विट संदेश मालिकेच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणाले :-
“निसर्गरम्य बांदीपूरच्या व्याघ्र प्रकल्पात सकाळची सफर केली आणि भारताच्या वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेचं दर्शन घेतलं.
“बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात या सर्वांची आणखी जास्त झलक अनुभवली”
“मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात भव्य हत्तींचं दर्शन घडलं”
“अत्यंत छान अशा बोम्मन आणि बेल्ली यांच्यासह बोम्मी आणि रघुला भेटण्यात काय अवर्णनीय आनंद होता”
पंतप्रधान कार्यालयानं ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की :-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांदीपूर आणि मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाकडे निघाले आहेत”
***
R.Aghor/S.Naik/P.Kor
(Release ID: 1915088)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam