पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई- कोईम्बतूर वंदे भारत एक्स्प्रेसला तमिळनाडूतील एमजीआर चेन्नई मध्य रेल्वे स्थानकात दाखवला हिरवा झेंडा
प्रविष्टि तिथि:
08 APR 2023 6:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूतील एमजीआर चेन्नई मध्य रेल्वे स्थानकात चेन्नई- कोईम्बतूर वंदे भारत एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. एमजीआर चेन्नई मध्य रेल्वे स्थानकात आल्यानंतर पंतप्रधानांनी चेन्नई- कोईम्बतूर वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि गाडीच्या कर्मचारी वर्गाशी तसेच लहान मुलांशी संवाद साधला.
पंतप्रधानांचा ट्विटर संदेश –
“चेन्नई आणि कोईम्बतूर या दोन शहरांना अधिक कनेक्टीव्हिटी देणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला धन्यवाद. गाडीला झेंडा दाखवला आणि छोट्या मित्रांचीही स्थानकात भेट घेतली.”
या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1914950)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada