आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे वॉकेथॉनचे आयोजन


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर डॉ. मनसुख मांडवीय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रविण पवार यांनी केलं वॉकेथॉनचं नेतृत्व

Posted On: 07 APR 2023 10:19AM by PIB Mumbai

जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर डॉ मनसुख मांडवीय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रविण पवार यांनी या वॉकेथॉनचं नेतृत्व केलं. ‘हेल्थ फॉर ऑल’ अर्थात सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार या वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. केवळ संसर्गजन्य आजारांना (NCDs) दूर ठेवणे एवढाच या कार्यक्रमाचा उद्देश नसून मानसिक जडणघडणीवर सकारात्मक प्रभाव राहण्यासाठी आरोग्यदायी सवयींबाबत जागरूकता पसरवणे हा याचा उद्देश होता. वॉकेथॉनला विजय चौकापासून सुरुवात झाली आणि कर्तव्य पथ इथून पुढे सरकत इंडिया गेट मार्गे पुढे निघून निर्माण भवन याठिकाणी वॉकेथॉनची सांगता झाली. उत्तम आरोग्यासाठी चालणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यात साडेतीनशेहून अधिक जण अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. हायपर टेन्शन, मधुमेह मानसिक आजार, कर्करोग यासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांना प्रतिबंध करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनमान राखण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

"It is health that is real wealth, not pieces of gold & silver." - Mahatma Gandhi

On #WorldHealthDay, we reiterate our commitment towards building a healthier India.

Take a look at how PM @NarendraModi Ji's Govt has been working relentlessly towards ensuring Health For All 👇 pic.twitter.com/6UAB57A00O

— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) April 7, 2023

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हेच भारताचं तत्वज्ञान असून या माध्यमातून आपण केवळ स्वतःच्याच नव्हे तर सर्वांच्याच प्रगतीचा विचार करतो असं त्यांनी सांगितलं. भारतानं आपला कोणताही व्यावसायिक लाभ न पाहता कोविड संकटाच्या काळात गरजू देशांना लसमात्रा आणि वैद्यकीय सहाय्याचा पुरवठा केला तेव्हा हेचं तत्वज्ञान प्रकर्षाने निदर्शनासं आलं असे म्हणाले. प्रत्येक संबंधिताला मदत करण्यात भारत आघाडीवर राहिला आहे आणि याच चैतन्यशील वृत्तीनं भारत आपल्या नागरिकांच्या आणि जगाच्या आरोग्यासाठी कार्यरत आहे असं ते म्हणाले.

 

वॉकेथॉन, योगा किंवा बाकीचे व्यायामप्रकार, आपल्या युवकांनी स्वतःच्या जीवनात ही शारीरिक सक्रियता अत्यंत उत्साहाने अंगी बाणवली आहे या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी भर दिला. सुदृढ व्यक्ती केवळ स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही तर सर्व समाजासाठी सक्रिय योगदान देतो, यातच “हेल्थ फॉर ऑल” या संकल्पनेचा उगम झाल्याचं त्या म्हणाल्या. वर्तनात्मक बदल आणि अधिक शारीरिक सक्रियतेला चालना देत फिट इंडिया चळवळीसाठी सन्माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशानं या माध्यमातून एक सशक्त पर्याय शोधला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

Smarjeet T/SN/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914568) Visitor Counter : 169