राष्ट्रपती कार्यालय
6 ते 8 एप्रिल दरम्यान राष्ट्रपती आसाम दौऱ्यावर
Posted On:
05 APR 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 6 ते 8 एप्रिल 2023 या कालावधीत आसामला भेट देणार आहेत.
7 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रपती काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील. नंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील. त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील.
8 एप्रिल, 2023 रोजी, राष्ट्रपती, तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून उड्डाण करतील.
* * *
Jaydevi PS/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1914080)
Visitor Counter : 182