अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मार्च 2023 मधे 1,60,122 कोटी रुपये सकल जीएसटी महसूल संकलित


एप्रिल 2022 मधील संकलनानंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

Posted On: 01 APR 2023 4:01PM by PIB Mumbai

 

मार्च 2023 मध्ये एकत्रित GST महसूल संकलन 1,60,122 कोटी रुपये आहे. यात CGST 29,546 कोटी रुपये, SGST 37,314 कोटी रुपये, IGST 82,907 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 42,503 कोटींसह) आणि अधिभार 10,355 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 960 कोटी रुपयांसह) आहे. चालू आर्थिक वर्षात चौथ्यांदा GST संकलनाने 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर GST लागू झाल्यापासून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन नोंदवले आहे. या महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक IGST संकलन झाले.

सरकारने IGST मधून नियमित थकबाकीपोटी  33,408 कोटी रुपये CGST आणि  28,187 कोटी रुपये SGST ची थकबाकी दिली आहे. मार्च 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर  केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी 62,954 कोटी रुपये आणि SGST साठी 65,501 कोटी रुपये इतका आहे.

मार्च 2023 मध्ये जीएसटीपोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 13% जास्त आहे. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयातीद्वारे जमा झालेला महसूल 14% जास्त आहे.

मार्च 2023 मधे आतापर्यंतचे सर्वाधिक परतावे दाखल झाले आहेत. मागच्या वर्षीच्या याच महिन्यात अनुक्रमे 83.1% आणि 84.7% च्या तुलनेत मार्च 2023 पर्यंत इनव्हॉइसचे 93.2% विवरण (GSTR-1 मध्ये) आणि 91.4 % परतावे (GSTR-3B मध्ये) दाखल झाले.

2022-23 साठी एकूण सकल संकलन 18.10 लाख कोटी रुपये आहे. तर संपूर्ण वर्षासाठी सरासरी सकल मासिक संकलन 1.51 लाख कोटी रुपये आहे.  2022-23 मध्ये एकूण महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 22% जास्त होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक सकल GST संकलन  पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 1.51 लाख कोटी रुपये, 1.46 लाख कोटी रुपये आणि 1.49 लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत 1.55 लाख कोटी रुपये आहे.

खालील तक्ता  चालू वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसुलाची आकडेवारी दर्शवितो. मार्च 2022 च्या तुलनेत मार्च 2023 मधील जीएसटीची राज्यवार आकडेवारी पुढील तक्ता दर्शवितो.

मार्च 2023 ची  जीएसटी महसुलामधील राज्यवार वाढ[1]

(₹ कोटी)

 

State

Mar-22

Mar-23

Growth (%)

1

Jammu and Kashmir

368

477

29.42

2

Himachal Pradesh

684

739

8.11

3

Punjab

1,572

1,735

10.37

4

Chandigarh

184

202

10.09

5

Uttarakhand

1,255

1,523

21.34

6

Haryana

6,654

7,780

16.93

7

Delhi

4,112

4,840

17.72

8

Rajasthan

3,587

4,154

15.80

9

Uttar Pradesh

6,620

7,613

15.01

10

Bihar

1,348

1,744

29.40

11

Sikkim

230

262

14.11

12

Arunachal Pradesh

105

144

37.56

13

Nagaland

43

58

35.07

14

Manipur

60

65

9.37

15

Mizoram

37

70

91.16

16

Tripura

82

90

10.21

17

Meghalaya

181

202

11.51

18

Assam

1,115

1,280

14.87

19

West Bengal

4,472

5,092

13.88

20

Jharkhand

2,550

3,083

20.92

21

Odisha

4,125

4,749

15.14

22

Chhattisgarh

2,720

3,017

10.90

23

Madhya Pradesh

2,935

3,346

14.01

24

Gujarat

9,158

9,919

8.31

25

Daman and Diu

 

 

 

26

Dadra and Nagar Haveli

284

309

8.99

27

Maharashtra

20,305

22,695

11.77

29

Karnataka

8,750

10,360

18.40

30

Goa

386

515

33.33

31

Lakshadweep

2

3

30.14

32

Kerala

2,089

2,354

12.67

33

Tamil Nadu

8,023

9,245

15.24

34

Puducherry

163

204

24.78

35

Andaman and Nicobar Islands

27

37

38.88

36

Telangana

4,242

4,804

13.25

37

Andhra Pradesh

3,174

3,532

11.26

38

Ladakh

23

23

-3.66

97

Other Territory

149

249

66.48

99

Center Jurisdiction

170

142

-16.31

 

Grand Total

1,01,983

1,16,659

14.39

वस्तूंच्या आयातीवर जीएसटी समाविष्ट नाही

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912963) Visitor Counter : 635