पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय सागरी सप्ताहाच्या प्रारंभाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
31 MAR 2023 9:13AM by PIB Mumbai
राष्ट्रीय सागरी सप्ताहाचा आरंभ हा सध्या बंदरांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासाला आणि बंदरांचा व्यवस्थित उपयोग करून आर्थिक समृद्धी साधण्यास चालना देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांच्या ट्विट संदेशाला ते उत्तर देत होते. सुरू झालेल्या राष्ट्रीय सागरी सप्ताह निमित्त पंतप्रधानांना पहिला सागरी ध्वज लावण्याबद्दल सोनोवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये माहिती दिली आहे. राष्ट्रीय सागरी दिवस म्हणजे 5 एप्रिल या दिवशी भारताच्या सागरी परंपरेच्या दैदीप्यमान इतिहासाचा सोहळा साजरा होतो.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,
"आपल्या समृद्ध सागरी इतिहासाशी आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी या राष्ट्रीय सागरी सप्ताहामुळे मिळाली आहे. सध्या बंदराभिमुख विकास आणि बंदरांचा अधिकाधिक उपयोग करत आर्थिक समृद्धी साध्य करणे या प्रयत्नांना यामुळे चालना मिळो."
***
Samarjeet T/Vijaya /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1912515)
आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam