पंतप्रधान कार्यालय
कलबुर्गीमध्ये पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणीबद्दल पंतप्रधानांनी केले कर्नाटकचे अभिनंदन
Posted On:
28 MAR 2023 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलबुर्गीमध्ये पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणी झाल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, "कलबुर्गी येथे पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्कची उभारणी झाली त्याबद्दल कर्नाटकातील बंधू भगिनींचे अभिनंदन! हा पार्क कर्नाटकाची समृद्ध वस्त्रपरंपरा अधिक समृद्ध करेल, त्याचबरोबर जनतेसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल."
#PragatiKaPMMitra”
लोकसभा खासदार उमेश जाधव यांच्या ट्विटर संदेशाला उत्तर देताना मेगा टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून देशाच्या वस्त्र प्रावरणाचे वैविध्य जगाला दाखवण्याच्या क्षमतेचा उल्लेख केला.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे " कर्नाटक, खासकरून कलबुर्गीसाठी हा विशेष दिवस आहे. या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून जगाला भारताच्या वस्त्र- प्रावरणाच्या वैविध्याची तसेच येथील कारागिरांच्या कलात्मकतेचे दर्शन घडेल."
#PragatiKaPMMitra”
R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1911572)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam