निती आयोग
भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाची दुसरी बैठक 18 आणि 19 मार्च 2023 रोजी सिक्कीम येथे होणार
Posted On:
17 MAR 2023 4:35PM by PIB Mumbai
भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाची दुसरी बैठक 18 आणि 19 मार्च 2023 रोजी सिक्कीममधील गंगटोक येथे होणार आहे. या बैठकीला जी 20 सदस्य आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी, बहुपक्षीय संघटनांचे प्रतिनिधी आणि भारतीय स्टार्टअप परिसंस्थेतील भागधारकांना आमंत्रित केले जाईल.
28 आणि 29 जानेवारी 2023 रोजी हैदराबाद येथे या गटाच्या स्थापना बैठकीत सर्व उपस्थित प्रतिनिधींच्या पाठिंब्याने अंतिम झालेली विषयपत्रिका सिक्कीम सभा पुढे पाठवेल. सर्वसहमतीवर आधारित महत्वाचे सार लक्षात घेत त्याद्वारे जागतिक स्टार्टअप परिसंस्थेत सुसंवाद साधण्यासाठी फाउंडेशन आणि अलायन्स टास्कफोर्स हे कृतिदल काम करेल. त्यामुळे स्टार्टअप्ससाठी जागतिक ज्ञान भांडार/हब उभारता येतील. जी 20 देशांमधील सर्वोत्तम कार्यपद्धती समोर आणणे आणि त्या सामायिक करणे यासाठी हे कृतिदल मदत करेल. सरकार, धोरणकर्ते, शैक्षणिक आणि संशोधन संस्था, उद्योग संघटना आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर (एसडीजी) वर लक्ष केंद्रित करणार्या स्टार्टअप्ससह आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत हे कृतीदल द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य देखील करेल. जी 20 राष्ट्रांमधील स्टार्टअप्ससाठी बाजारपेठेतील जागतिक प्रवेश आणि प्रतिभेसाठी हे कृतिदल यंत्रणा तयार करेल. उद्योग क्षेत्रातील कंपन्या आणि सरकारी संस्थांना स्टार्टअप्ससोबत काम करण्यासाठी सहायक धोरणांची शिफारसही हे कृतीदल करेल.
स्टार्टअप्ससाठी उपलब्ध असलेली आर्थिक साधने अधिक व्यापक करत वित्तपुरवठा आणि गुंतवणूकीसाठीचे व्यासपीठ उपलब्ध करून देत स्टार्टअप्ससाठी भांडवल मिळवून देणे हे या आर्थिक कृतिदलाचे उद्दिष्ट असेल.
सिक्कीम सभेत, स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाच्या कृतिदलाचे सदस्य (जी 20 राष्ट्रांतील प्रतिनिधींचा समावेश), अधिकृत धोरण निवेदनाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा आणि वाटाघाटी करतील. या कार्यक्रमादरम्यान इतर विविध उपक्रम, स्टार्टअप 20X चे आयोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी मार्ग येथे एक कार्यक्रम होईल. या वेळी सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी रुमटेक मठाला भेट देतील.
अधिकृत धोरण निवेदन, सामायिक मान्यताप्राप्त विषय सारआणि संज्ञांचा संच असलेली स्टार्टअप पुस्तिका, सीमा ओलांडून सहकार्य वाढवण्यासाठी जागतिक नवीनता उपक्रम केंद्र आणि जगभरातील स्टार्टअप परिसंस्थेसाठी जागतिक संपर्क व्यासपीठ म्हणून स्टार्टअप 20 चा प्रचार ही स्टार्टअप 20 ची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908016)
Visitor Counter : 222