पंतप्रधान कार्यालय
पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स ही मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड याचे उत्कृष्ट उदाहरण ठरतील-पंतप्रधान
Posted On:
17 MAR 2023 2:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे उभारण्यात येणार असलेली पीएम मित्र मेगा टेक्सटाईल पार्कस पाच एफ् च्या माध्यमातून (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) भारताच्या कापड व्यवसाय क्षेत्राला चालना देतील.
पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा देतील, त्याचबरोबर कोट्यावधीची गुंतवणूक आणतील आणि लाखो रोजगार निर्माण करतील. असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे :
‘पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स, कापड उद्योग क्षेत्राला 5 एफ (फॉर्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) दृष्टीकोनानुरूप चालना देतील. पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे उभारण्यात येतील ही माहिती सामायिक करताना आनंद होत आहे.’
"पीएम मित्र मेगा टेक्स्टाईल पार्क्स कापड उद्योग क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा पुरवतील, करोडोंची गुंतवणूक आकर्षित करतील आणि लाखो रोजगारांची निर्मिती करतील. हे मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड याचे उत्कृष्ट उदाहरण ठरेल." #PragatiKaPMMitra”
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908001)
Visitor Counter : 313
Read this release in:
Punjabi
,
Hindi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam