पंतप्रधान कार्यालय

भारताला निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचारी करत असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक


राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, लोकांचे लसीकरण करण्यात भारताने केलेल्या प्रगतीचेही पंतप्रधानांकडून स्मरण

Posted On: 16 MAR 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

भारताला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, पंतप्रधानांनी निरोगी भारत निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि लोकांचे लसीकरण करण्यासाठी भारताने केलेल्या प्रगतीचेही स्मरण केले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांच्या यासंदर्भातल्या एका ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;

“भारत निरोगी ठेवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल आमच्या सर्व आरोग्यसेवा कर्मचार्‍यांचे अभिनंदन.

राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त, आपण लोकांच्या लसीकरणासाठी भारताने केलेल्या प्रगतीचे स्मरण करतो आणि निरोगी भारत निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.”

 

* * *

S.Patil/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907576) Visitor Counter : 163