पंतप्रधान कार्यालय

भारताचे बंदर क्षेत्रं वेगाने वाढत आहे आणि आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देत आहे: पंतप्रधान

Posted On: 16 MAR 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11.35% च्या वार्षिक  वाढीच्या तुतीकोरीन V.O.C. बंदराच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 14.03.2023 पर्यंत या बंदरावरून 36.03 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली गेली आहे आणि 2022-23 या आर्थिक वर्षात 17 दिवस अगोदरच जहाजबांधणी मंत्रालयाने निर्धारित केलेले 36 दशलक्ष टनांचे लक्ष्य ओलांडले आहे.

व्ही.ओ. चिदंबरनार तुतीकोरीन बंदर प्राधिकरणच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

“खूप छान!  भारताचे बंदर क्षेत्र वेगाने वाढत आहे आणि आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देत आहे.

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907572) Visitor Counter : 171