गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत पाच राज्यांना 1,816.162 कोटी रुपयांच्या अतिरिक्त केंद्रीय मदतीला मंजुरी
Posted On:
13 MAR 2023 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय समितीने 2022 मध्ये पूर, भूस्खलन, ढगफुटी यांची झळ पोहोचलेल्या पाच राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी(एनडीआरएफ) अंतर्गत अतिरिक्त केंद्रीय मदतीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा या नैसर्गिक आपत्तींची झळ पोहोचलेल्या पाच राज्यांना मदत करण्याचा संकल्प यातून दिसून येतो.
या उच्च स्तरीय समितीने एनडीआरएफमधून या पाच राज्यांना 1816.112 कोटी रुपयांच्या अतिरिक्त केंद्रीय मदतीला मंजुरी दिली आहे. या मदतीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे :-
आसामला 520.466 कोटी रुपये
हिमाचल प्रदेशला रु. 239.31 कोटी रुपये
कर्नाटकला रु. 941.04 कोटी रुपये
मेघालयला रु. 47.326 कोटी रुपये
नागालँडला रु. 68.02 कोटी रुपये
ही अतिरिक्त मदत केंद्राकडून राज्यांना देण्यात येणारा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) जो यापूर्वीच राज्यांना वितरित झाला आहे, त्याव्यतिरिक्त देण्यात येत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 25 राज्यांना 15,770.40 कोटी रुपयांचा एसडीआरएफ निधी दिला आहे आणि एनडीआरएफमधून 4 राज्यांना 502.744 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
या आपत्ती आल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांकडून होणाऱ्या पत्रव्यवहाराची वाट न पाहता या राज्यांसाठी आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथके तैनात केली होती.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906428)
Visitor Counter : 189