गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आर आर आर चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याचे आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटाचे प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल केले अभिनंदन


‘नाटू नाटू’ साठी ऑस्कर पुरस्कार हा भारतीय चित्रपटांसाठी ऐतिहासिक दिवस आहे, हे गीत सर्व भारतीय आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या ओठांवर होते, ‘RRR’ चित्रपटाच्या चमूचे अभिनंदन

'द एलिफंट व्हिस्परर्स' चित्रपटाने हत्तींना वाचवण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकला, हा पुरस्कार भारतीय चित्रपट उद्योगाची क्षमता अधोरेखित करत युवा चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक ठरेल”

Posted On: 13 MAR 2023 1:03PM by PIB Mumbai

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल आर आर आर चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याचे आणि 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटाचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा दिवस, कारण ऑस्कर पुरस्कार जिंकून या गाण्याने इतिहास रचला आहे. हे गाणे प्रत्येक भारतीयाच्या तसेच जगभरातील संगीतप्रेमींच्या ओठावर होते. RRR @ssrajamouli @mmkeeravaani @boselyricist @tarak9999 @AlwaysRamCharan चमूचे अभिनंदन.”

दुसर्‍या ट्विटमध्ये अमित शाह म्हणाले, 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटासाठी ऑस्कर जिंकल्याबद्दल “@EarthSpectrum आणि @guneetm चे अभिनंदन. हा चित्रपट हत्तींना वाचवण्यासाठीच्यि भारताच्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपट उद्योगाची क्षमता अधोरेखित करत तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक ठरेल.  

***

S.Thakur/S.Mukhedkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906330) Visitor Counter : 182