पंतप्रधान कार्यालय
‘नाटु नाटु’ला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
Posted On:
13 MAR 2023 10:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगीत दिग्दर्शक एम एम कीरवानी , गीतकार चंद्रबोस आणि ‘नाटु नाटु’ या ‘गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट स्वतंत्र गीत’ या विभागातील ऑस्कर पुरस्कार मिळवल्याबद्दल ‘आर आर आर’ चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
‘आर आर आर’ चित्रपटातील ‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून त्याचे हे यश उल्लेखनीय असल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे.
अकादमी पुरस्काराकडून केल्या गेलेल्या ट्विट ला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी ट्विट केले,
“उल्लेखनीय !
‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून हे गाणे आगामी अनेक वर्ष संस्मरणीय ठरेल. @mmkeeravaani ,@boselyricist आणि संपूर्ण चमूचे या प्रतिष्ठित सन्मानासाठी अभिनंदन.
संपूर्ण भारत यासाठी आनंदित आहे आणि भारताला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. #Oscars”
****
Jaidevi PS/Uma/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906281)
Visitor Counter : 221
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam